Home अहमदनगर शिर्डीत भीषण अपघात: एकाचा मृत्यू, चार जखमी

शिर्डीत भीषण अपघात: एकाचा मृत्यू, चार जखमी

Breaking News | Ahmednagar: नगर-मनमाड महामार्गावर विद्युत रोषणाईचे काम करणाऱ्या एका तरुणाचा वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू.

accident in Shirdi One dead, four injured

शिर्डी: शिर्डी साई संस्थान व शिर्डी ग्रामस्थांकडून श्रीराम नवमी उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, रविवारी रात्री शिर्डीतून जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गावर विद्युत रोषणाईचे काम करणाऱ्या एका तरुणाचा वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला.

प्रवीण गवांदे असे या ३२ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. तो अस्तगाव येथील रहिवासी होता. रविवारी (दि.१४) रात्री साडेदहाच्या सुमारास नगर-मनमाड मार्गावरील डी मार्ट मॉलसमोर हा भयानक अपघात झाला. रामनवमी उत्सवानिमित्त रोषणाईचे काम सुरू असताना रस्त्यावरील शिर्डी नगरपरिषदेच्या विद्युत विभागाच्या क्रेन वाहनाला भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात प्रवीण गवांदे यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य चारजण जखमी झाले आहेत.

शिर्डीत रामनवमी उत्सवानिमित्ताने सर्वत्र विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरू आहे. नगर-मनमाड मार्गावरही या प्रकारे काम सुरू होते. त्यात गंवादे हे या कामात असताना अपघात झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: accident in Shirdi One dead, four injured

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here