Home अहमदनगर अहमदनगर: विजेचा धक्का बसून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

अहमदनगर: विजेचा धक्का बसून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: इलेक्ट्रिक मोटार ढकलण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याची ही घटना.

Young farmer dies due to electric shock

राहुरी: मुळा धरणाच्या पाणीसाठ्यावर असलेली इलेक्ट्रिक मोटार ढकलण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याची ही घटना गाडकवाडी (ताहराबाद) येथे सोमवारी दुपारी घडली. नीलेश बाबासाहेब तारडे (वय २७), असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे. यामुळे मुळा धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. गाडकवाडी येथील शेतकऱ्यांनी धरणाच्या पाण्यातून शेती सिंचनासाठी पाइपद्वारे पाणी पठारावर आणले आहे. पाणीसाठा कमी झाल्याने पाण्यातील मोटार उघडी पडत होती. ती पाण्यात ढकलण्यासाठी नीलेश दोन साथीदारांसह गेला होता. मोटार ढकलून झाल्यावर स्टार्टरचे खोके उचलत असताना अचानक विजेचा झटका बसून पाण्यामध्ये कोसळला. ही बाब लक्षात येताच इतरांनी तातडीने त्याला लोणी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: Young farmer dies due to electric shock

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here