Home Accident News अहमदनगर: टँकर अपघातात एकाचा मृत्यू- Accident

अहमदनगर: टँकर अपघातात एकाचा मृत्यू- Accident

Ahmednagar | Kopargaon Accident:  ताब्यातील महिंद्रा बलकर सिमेंट टँकरने शिर्डी नाशिक रस्त्यावर पायी चालणाऱ्यास जोराची धडक.

One dies in a tanker accident

कोपरगाव: तालुक्यातील चांदेकसारे शिवारातील हॉटेल साई मुकुंदा समोर चालक सचिन रमेश चव्हाण (रा. अल्लापूर तांडा ता. जेवरगी जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक) याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा बलकर सिमेंट टँकरने (क्र.के.ए.२८. डी. ११५६) शिर्डी नाशिक रस्त्यावर पायी चालणाऱ्या प्रसाद रामदास तुवर ( वय २० रा. पानमळा, चांदेकसारे ता. कोपरगाव) यास जोराची धडक दिली. ही घटना गुरुवारी (दि. १८) ऑगस्टला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यात प्रसाद तुवर गंभीर जखमी झाल्याने

त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विजय केशवराव होण (रा. चांदेकसारे ता. कोपरगाव ) यांच्या फिर्यादीवरून चालक सचिन चव्हाण याच्यावर सोमवारी (दि. २२) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One dies in a tanker accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here