Home अहमदनगर अहमदनगर: रिक्षा दुभाजकाला आदळल्याने अपघात, एकाचा मृत्यू

अहमदनगर: रिक्षा दुभाजकाला आदळल्याने अपघात, एकाचा मृत्यू

Shrigonda One killed as rickshaw Accident 

Ahmednagar | श्रीगोंदा: नगर-दौंड रोडवर अरणगाव शिवारात रस्ता दुभाजकाला रिक्षा धडकून उलटल्याने अपघात (Accident) झाला. या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.२७) रात्री ८.३० च्या सुमारास झाला. या अपघातात प्रशांत पोपट कांबळे (वय ३६, रा.अरणगाव, ता.नगर) या रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मयत प्रशांत यांच्या पत्नी छाया प्रशांत कांबळे (वय ३२, रा.अरणगाव) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरणगाव शिवारात दत्तात्रय शांताराम देवगावकर यांनी त्यांच्या बंगल्याच्या कामासाठी आणलेली कच नगर-दौंड महामार्गावर टाकली होती. त्यामुळे रिक्षा घेऊन चाललेले प्रशांत कांबळे यांच्या रिक्षाचे चाक त्यावर गेल्याने रिक्षा घसरुन दुभाजकावर जावून धडकली व पलटी झाली. या अपघातात रिक्षा चालक कांबळे रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला.या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेले दत्तात्रय देवगावकर यांच्या गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Shrigonda One killed as rickshaw Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here