Home संगमनेर संगमनेर तालुक्यात गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले, लाखो लंपास

संगमनेर तालुक्यात गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले, लाखो लंपास

Sangamner taluka, ATMs were theft with the help of gas cutters

Sangamner | संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील टाटा इंडिकॅश कंपनीचे  एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या  सहाय्याने फोडून (ATM Theft) 1 लाख 17 हजार रुपयांची रक्कम लंपास केली. या घटनेने परिसरात खळबळजनक उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अज्ञात चोरट्यांनी सोमवार व मंगळवार दरम्यानच्या रात्रीच्या सुमारास तळेगाव दिघे येथील नान्नज दुमाला रस्त्याच्याकडेला असलेल्या सय्यद बाबा टेकडी परिसरातील टाटा इंडीकॉमचे एटीएम  गॅस कटरच्या  सहाय्याने फोडले. सुरुवातीला चोरट्यांनी एटीएमच्या गाळ्याच्या शटरला असलेले कुलूप गॅस कटरच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्याच सहाय्याने एटीएम फोडले  एटीएम मधून चोरट्यांनी 1 लाख 17 हजार रुपयांची रक्कम लंपास केली.

मंगळवारी सकाळी स्थानिक नागरिकांनाच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यास माहिती दिली. तळेगाव दिघे येथील टाटा इंडिकॅशचे एटीएम यापूर्वीही अज्ञात चोरट्यांनी फोडले होते. त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडले होते. पुन्हा आता टाटा इंडिकॅशचे एटीएम दुसर्‍यांदा फोडण्याची ही घटना घडली. याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: Sangamner taluka, ATMs were theft with the help of gas cutters

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here