Home अकोले अकोले तालुक्यात शेतातील रस्त्याच्या वादातून एकाचा खून, आरोपी अटकेत

अकोले तालुक्यात शेतातील रस्त्याच्या वादातून एकाचा खून, आरोपी अटकेत

Breaking News | Akole Crime: शेतीच्या वादातून ७० वर्षीय शेतकऱ्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना. (Killed)

One killed in farm road dispute, accused arrested

अकोले: तालुक्यातील भंडारदरा वाकी परिसराजवळील मान्हेरे शिवारातील शेतीच्या वादातून ७० वर्षीय शेतकऱ्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.  २४ जानेवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेतकऱ्याची शेतीच्या वादातून एकमेकांसोबत वाद झाल्यानंतर रात्री उशीरा ही घटना घडली. या गुन्ह्यातील संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली. आरोपीला ताब्यात घेतले. काशिनाथ सोमा बांबळे असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मान्हेरे गावातील काशिनाथ बांबळे व संशयित आरोपी विशाल बांबळे यांच्यात अनेक दिवसांपासून शेतातील रस्त्यावरून वाद आहेत. २४ जानेवारी दुपारी १.३० वाजता त्यांच्यात बाचाबाची झाली. नंतर मारहाणीत होऊन विशाल याने काशिनाथ बांबळे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा काशिनाथ याला सोडवण्यास दोन्ही सुना मध्ये पडल्या. त्यांना आरोपीने मारहाण केली. मारहाणीत काशिनाथ सोमा बांबळे जखमी झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.  या घटनेने मान्हेरे परिसरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात राजूर पोलिस ठाण्यात मृताची सून सुनीता नवनाथ बांबळे यांनी फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी आरोपी विशाल हरी बांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एफ. जे. शेख करीत आहेत.

Web Title: One killed in farm road dispute, accused arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here