Home नाशिक प्रवाशांनी भरलेल्या एका धावत्या बसने अचानक घेतला पेट, बस खाक तर…

प्रवाशांनी भरलेल्या एका धावत्या बसने अचानक घेतला पेट, बस खाक तर…

Breaking News | Nashik: खाजगी ट्रॅव्हल्स गाडीचा पाठी मागील टायर अचानक फुटला धावत्या बसचा टायर फुटल्यानंतर बसने तेथेच पेट (Fire) घेतला.

Running bus full of passengers suddenly caught fire, the bus was gutted

नाशिक: नाशिकमध्ये आज पाहाटेच्या सुमारास अपघाताची एक मोठी घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या एका धावत्या बसने अचानक पेट घेतला. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बसमधील प्रवाशांच्या सामानाचे आणि बसचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास नाशिकच्या नांदगाव-मालेगाव रोडवर रामवाडी शिवारात इंदैरहून पुण्याला जाणा-या खाजगी ट्रॅव्हल्स गाडीचा पाठी मागील टायर अचानक फुटला. धावत्या बसचा टायर फुटल्यानंतर बसने तेथेच पेट घेतला

यावेळी वाहनचालकाने वेळीच बस थांबवत बसमध्ये असलेल्या ४० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र बसने पेट घेतला असल्याने बसमधील जे पार्सल होते ते बस सह जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव येथून अग्निशामक घटनास्थळी पोहचले.

मात्र अग्निशामकदल घटनास्थळी पोहचेपर्यंत बस जळून पूर्णता खाक झाली होती. सुदैवाने यात कुणालाही काही ईजा झाली नसली तरी बसमधील प्रवाशांच्या सामानाचे आणि बसचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Running bus full of passengers suddenly caught fire, the bus was gutted

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here