Accident: संगमनेर तालुक्यात रस्त्याच्या खड्यांमुळे अपघातात एकाचा बळी
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील मोलमजुरी करणाऱ्या एका कामगाराची रस्त्यातील खड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. वडगाव फाटा ते तळेगाव दिघे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून हे धोकादायक असल्याने खड्डे बुजविण्याची व रस्ता दुरुस्थ करण्याची मागणी अनेक दिवसांपासून चालक व नागरिक करीत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने काल अपघात होऊन जीव गमवावा लागला आहे. या घटनेने परिसरात संतापाची भावना निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निळवंडे येथील सोमनाथ रघुनाथ आव्हाड वय हे रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास आपले काम आटोपून घरी परतत होते. दरम्यान तळेगाव रस्त्यावरील देवीच्या मंदिराजवळ रात्रीच्या अंधारात रस्त्यातील खड्डा न दिसल्यामुळे त्यांची दुचाकी जोरात आदळून आव्हाड हे गाडीवरून उडून रस्त्यात पडले, या अपघातात (Accident) त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
या अपघातास सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून त्यांनी या अपघाताची जबाबदारी घेऊन मयताच्या परिवारास मदत करावी तसेच रस्ता दुरुस्थ त्वरित करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिरडे यांनी केली आहे.
Web Title: One killed in road accident in Sangamner taluka