Home क्राईम घुलेवाडीत विवाहितेचा राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या, वडिलांचा आरोप

घुलेवाडीत विवाहितेचा राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या, वडिलांचा आरोप

Sangamner Suicide by hanging in the house of a married woman

संगमनेर | Suicide: नवीन घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी पतीसह सासरच्या मंडळीनी दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना घुलेवाडी येथे घडली. शाहीन मोहसीन शेख असे या आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, सन २०१३ मध्ये मयत शाहीन शेख व मोहसीन रमजान शेख यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पैशासाठी पती मोहसीन व सासू जरीना, नणंद आसमा यांनी शाहीन हिला त्रास देण्यास सुरुवात केली. घर व गाडी घेण्यासाठी सातत्याने तिच्याकडे पैशाचा तगादा लावला जात होता. या त्रासाला कंटाळून शाहीन हिने रविवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत महिलेचा भाऊ आवेश शेख व वडील इनुस शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आपल्या मुलीला मारहाण करून गळफास दिल्याचा आरोप केला आहे. मयत विवाहितेला शवविचेदन करण्यासाठी कॉटेज रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी तिच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा दिसून आल्याचे माहेरकडील लोकांनी म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पती, सासू व नणंद यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस करीत आहे.   

Web Title: Sangamner Suicide by hanging in the house of a married woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here