Home अकोले राजूर पोलिसांनी पाठलाग करत देशी दारुचे बॉक्स असलेली पिकअप पकडली

राजूर पोलिसांनी पाठलाग करत देशी दारुचे बॉक्स असलेली पिकअप पकडली

Crime News Rajur police chased and caught a pickup 

अकोले | Crime News : शनिवारी 11/12/2021 रोजी रात्री 02.30 वा. चे सुमारास शेंडी भंडारदरा गावातील सरकार मान्य देशी दारुचे दुकान फोडून रात्री दोन अनोळखी आरोपींनी दुकानातील देशी दारुचे बॉक्स पिकअप मध्ये भरले असल्याचे वॉचमनच्या लक्षात त्याने तात्काळ गावातील इतर लोकांना कळविले.

त्याची आरोपींना चाहुल लागल्याने ते पिकअप वाहनासह गुहिरे मार्गे रंध्याकडे पळाले बाबतची माहिती राजूर पोलीस स्टेशनला कळविल्याने लगेच सपोनि साबळे यांनी घटनेची दखल घेवुन रात्रगस्त करत असलेले पोना डगळे, पोकॉ फटांगरे, व चापोकॉ मुळाणे यांना सरकारी वाहनाने रंधा मार्गे गुहिरेकडे जाण्यास सांगितले. असता सदर पिकअप वाहन गुहिरेकडुन रंध्याकडे येत असतांना पोलीसांनी हे वाहन पिकप वाहन आडविण्याचा प्रयत्न केला असता ते त्या ठिकाणाहून पळुन गेले.

पोलीसांनी त्यांचा पाठलाग करीत असतांना दोघे अनोळखी आरोपी पिकअप वाहन सोडुन अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. सदर पिकअप वाहनाची पाहणी केली असता त्यात दोघे अनोळखी आरोपी यांनी सरकारमान्य देशी दारु दुकान शेंडी येथुन एकुण 1,26,480 रु किंमतीचा देशी दारुचा चोरी केलेला माल मिळुन आला. पिकअप वाहन क्रमांक एम एच 14 सी पी 0937 हिचे बाबत तपास केला असता नमुद पिकअप वाहन हे आरोपींनी दिनांक 10/12/2021 रोजी पहाटेच्या सुमारास नारायणगाव पोलीस स्टेशन हदीतुन चोरुन आणलेचे निष्पन्न झाले. सदर बाबत राजूर पोलीस स्टेशनला गु र नं 208/2021 भा द वि कलम 380, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. श्री मनोज पाटील पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर, मा.श्री राहुल मदने, उपविभागिय पोलीस अधिकारी, संगमनेर याच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोसई नितीन खैरनार, पोनादिलीप डगळे पो काँ विजय फटांगरे, पोकों अशोक काळे, पोकॉ अशोक गाढे, चापोकों मुळाणे यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पोसई नितीन खैरनार करीत आहेत.

Web Title: Crime News Rajur police chased and caught a pickup

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here