Home अकोले अकोलेतील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांनी केला गजाआड

अकोलेतील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांनी केला गजाआड

Accused of rape in Akole arrested by police

अकोले | Rape Case: दि 12/8/20218 रोजी राजुर पोलीस स्टेशन  ला गु.र.नं. 52/2018 भा.द.वि.कलम 376,376 (2), (आय), (एन),506 सह लैंगिक अपराधांपासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4.5 (जे) (2) (एल) प्रमाणे गुन्हा दाखल असलेल्या  फ् रार आरोपीला राजूर  पोलिसांनी  गजाआड केले आहे

अल्पवयीन मुलीच्या फिर्यादी वरुन दाखल असलेल्या  या  गुन्ह्यात   फिर्यादी मुलीचे  आई वडील बाहेरगावी गेलेले असतांना तिचे अल्पवयाचा व घरात एकटी असल्याचा फायदा घेवून सहा आरोपीनी तिचे इच्छेविरुध्द जबरीने बलात्कार करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती.

सदर गुन्हयातील पाच आरोपी यांना गुन्हा घडल्यानंतर तात्काळ अटक केली होते. त्यातील एक आरोपी  कृष्णा उर्फ किसन आत्माराम उकले, राह-घाटघर, ता-अकोले हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता.

मा.पोलीस अधिक्षक सो, अहमदनगर याचे आदेशान्वये दिनांक 10/12/2021 रोजी रात्री राजुर पोलीस स्टेशन हददीतील फरार व पाहीजे आरोपी शोधण्यासाठी ऑलआउट ऑपरेशन राबविण्यात आले होते. ऑल आउट ऑपरेशन दरम्यान गुन्हयातील 2018 सालापासुन फरार आरोपी नामे कृष्णा उर्फ किसन आत्माराम उकले, राह-घाटघर, ता-अकोले याचा शोध घेतला असता तो घाटघर गावात मिळुन आला. त्यास सदर गुन्हयात अटक केली असुन त्यास . न्यायालयात हजर केले असता दिनांक 14/12/2021 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. श्री मनोज पाटील, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर, मा.श्री राहुल मदने, उपविभागिय पोलीस अधिकारी, संगमनेर याच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नरेद्र साबळे, पोसई, नितीन खैरनार, पोना दिलीप डगळे, पो कॉ अशोक काळे, पो कॉ अशोक गाढे, पो कॉ विजय फटांगरे यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पोसई, नितीन खैरनार करीत आहेत.

Web Title: Accused of rape in Akole arrested by police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here