Home अहमदनगर Accident | अहमदनगर:  ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत अपघातात, एक जण ठार

Accident | अहमदनगर:  ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत अपघातात, एक जण ठार

One killed in truck-bike collision Accident

पारनेर |Ahmednagar| Parner:  अहमदनगर-पुणे महामार्गावर सुपा येथे हॉटेल लोकसेवा जवळ दुचाकीला ट्रकचा कट बसल्याने झालेल्या अपघातात (Accident)  नगर येथील व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान सुपा येथील हॉटेल लोकसेवा समोर एक दुचाकीस्वार पुण्याच्या दिशेकडून नगरच्या दिशेने जात असताना त्याच वेळी पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेने जात असलेल्या ट्रकची दुचाकीला जोराचा धक्का लागला व दुचाकीस्वार पाच ते दहा फुट फेकला गेल्याने जबर जखमी झाला.

त्यावेळी तेथे असलेल्या लोकसेवा हॉटेलचे मालक अमोल पवार यांनी जखमी दुचाकीस्वाराला तात्काळ मदत करत स्वतःच्या गाडीतुन येथील सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र जखमी दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार व रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने सदर व्यक्ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलीस  घटनास्थळी दाखल होऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. याबाबत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

Web Title: One killed in truck-bike collision Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here