Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन विद्यार्थीनीला रस्त्यात अडवून विनयभंग

अहमदनगर: अल्पवयीन विद्यार्थीनीला रस्त्यात अडवून विनयभंग

Molestation of a minor student by blocking the road

श्रीरामपूर | Shrirampur: अल्पवयीन विद्यार्थीनीला रस्त्यात अडवून विनयभंग (Molestation) केल्याची घटना तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे घडली. त्रास देणार्‍या तरूणास जाब विचारण्यासाठी गेलेल्या विद्यार्थीनीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

बेलापूर परिसरात राहणार्‍या एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीचा आरोपी विलास चांगदेव भगत (वय 38, रा. बेलापूर खुर्द, ता. श्रीरामपूर) याने पाठलाग करून तिला रस्त्यात अडवून छेड काढत त्रास दिला. त्याबाबत विद्यार्थीनीने झालेला प्रकार वडिलांना सांगितला. वडील संबंधित तरुणाला जाब विचारण्यास गेले असता त्याने विद्यार्थीनीच्या वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विद्यार्थीनीच्या आईला ढकलून दिले व विद्यार्थीनीला पाठीमागून मिठी मारून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला.

याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विलास चांगदेव भगत (वय 38, रा. बेलापूर खुर्द, ता. श्रीरामपूर) याच्याविरूद्ध भादंवि कलम 354, 354 ड, 341, 323, 504, 506, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण पोक्सो कायदा 2012 चे कलम 8 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करुन विलास भगत याला अटक केली. पोलीस निरिक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक बोर्से हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Molestation of a minor student by blocking the road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here