Home महाराष्ट्र Accident | एकाच मोटरसायकलवर चौघे मित्र जात असताना अपघात, तिघे ठार एक...

Accident | एकाच मोटरसायकलवर चौघे मित्र जात असताना अपघात, तिघे ठार एक जखमी

Accident while four friends were riding on the same motorcycle, three killed

सांगली | Sangali: एकाच मोटरसायकलवर चौघे मित्र जात असताना भीषण अपघातात (Accident) तीन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जत तालुक्यातील कोसारी इथं हा अपघात झाला आहे. चौघे मित्र मोटरसायकलवरून जतहून कोसारीकडे येताना हा दुर्दैवी अपघात झाला. या घटनेने कोसारी गावावर शोककळा पसरली आहे.

या अपघातात अजित नेताजी भोसले, मोहित शिवाजी तोरवे आणि राजेंद्र भाले अशी ठार झालेल्या मित्रांची नावं आहेत. तर संग्राम विक्रम तोरवे हा जखमी आहे.

कोसारी येथील अजित भोसले व त्याचे मित्र एकाच मोटरसायकलवर चौघे जण शनिवारी जतला गेले होते .हे चौघे रात्री उशिरा गावाकडे परतत होते. विजयपुर गुहागर राष्ट्रीय महामार्गवरील बिरनाळ नजीक असणाऱ्या धोकादायक वळणावर ओढा पात्रानजीक मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने गाडी घसरून हा अपघात झाला. ज्यामध्ये अजित भोसले हा जागीच ठार झाला तर जखमी मोहित तोरवे, राजेंद्र भाले, संग्राम तोरवे या तिघांना बिरनाळ येथील ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील गंभीर जखमी झालेले मोहित शिवाजी तोरवे (वय २१), राजेंद्र भाले (वय २२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. तर संग्राम विक्रम तोरवे ( वय-१६) याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Accident while four friends were riding on the same motorcycle, three killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here