Home महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण

Devendra Fadnavis Corona Positive

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी  स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वीही कोरोनाची लागण झाली होती.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,  माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्हि आली आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे उपचार आणि औषधपाणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी,.

कोरोना झाल्यानंतर साधारण सात दिवस क्वारंटाईन राहावे लागते. त्यामुळे १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीला देवेंद्र फडणवीस कसे उपस्थित राहणार,का नाही हे पाहावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे या नेत्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

देवेंद्र फडणीस हे काल लातूर दौऱ्यावर होते. लातूरचा दौरा झाल्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांना ताप आल्यामुळं तो दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले.

Web Title: Devendra Fadnavis Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here