Home कोपरगाव छतावर आढळलेल्या दाम्पत्याच्या खून प्रकरणी तीन आरोपी जेरबंद- Murder Case

छतावर आढळलेल्या दाम्पत्याच्या खून प्रकरणी तीन आरोपी जेरबंद- Murder Case

Three accused arrested in couple's murder case found on roof

Ahmednagar  | Kopargaon | कोपरगाव:  कोपरगाव तालुक्यातील आपेगाव शिवारातील भुजाडे वस्तीवर राहत्या घराच्या छतावर दांपत्यांचा मृतदेह (Dead bodies) आढळून आले होते. दत्तात्रय गंगाधर भुजाडे अंदाजे (वय 75) व पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय 65) या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह होते. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. चोरी व खून (Murder) करून आरोपी पसार झाले होते.

या प्रकरणी खुन करुन जबरी चोरी करणाऱ्या पढेगाव येथील तीन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने संयुक्त कारवाई करत जेरबंद केले आहे. अजय छंदू काळे (वय १९), अमित कागद चव्हाण(वय २०) व जंतेश छंदू काळे(वय २२) असे अटक (Arrest) केलेल्या आरोपींची नावेआहेत.  अवघ्या तीन दिवसात पोलिसांनी आरोपींना जेरबंद केल्याची कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Three accused arrested in couple’s murder case found on roof

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here