Home महाराष्ट्र कारचा चक्काचूर, माळशेज घाटात दरड कोसळली

कारचा चक्काचूर, माळशेज घाटात दरड कोसळली

pain subsided in Malshej Ghat

मुरबाड: गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसात माळशेज घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात.कल्याण अहमदनगर माळशेज घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळून दुर्घटना घडली आहे.

घाटातून जाणाऱ्या एका कारवर ही दरड कोसळली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही दरड कोसळली. या घटनेत गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. माळशेज घाट काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता.

अगोदरच माळशेज घाटात रस्त्याचे काम सुरु आहे. त्यात दरड कोसळल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. ही माहिती समजताच घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले असून दरड हटविण्याचे काम सुरु आहे.  

Web Title: pain subsided in Malshej Ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here