Home अहमदनगर तरुणाचा मृतदेह आढळल्याने राहता तालुक्यात खळबळ

तरुणाचा मृतदेह आढळल्याने राहता तालुक्यात खळबळ

Rahata taluka after the body of the youth was found

राहता | Rahata: शिर्डी शहरालगत असलेल्या कनकुरी गावाच्या हद्दीत ९ जून रोजी पाच वाजेच्या सुमारास ईश्वरदास वाघमारे यांच्या शेतात एक तरुणाचा बेवारस मृतदेह असल्याची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाल्याने तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन बारकाईने पाहणी केली असता सदर मयताचे वय ३० वर्ष असावे असे पोलिसांनी सांगितले. तसेच ओळख पटेल असा कोणताही पुरावा आढळून आला नाही.

सदर तरुण नेमकी या परिसरात कसा आला, त्याला जिवंतपणे कोणी बघितले का त्याचे या गावात कोणी मित्र नातेवाईक आहेत का या दृष्टीकोनातून देखील पोलिसांनी चौकशी केली. याबाबत अधिक माहिती मिळाली नसून तरुण कोण, कुठला, काय याचा शोध पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या तालुक्यात, जिल्ह्यात कोणी बेपत्ता आहे का याचा शोध सुरु असून स्थानिक गुन्हे शाखेला देखील माहिती देण्यात आली आहे. या घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांमधून विविध शंका उपस्थित होत आहे.  

Web Title: Rahata taluka after the body of the youth was found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here