Home संगमनेर संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

Sangamner Shepherd injured in Bibatya attack

संगमनेर | Sangamner: गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यात पठार भागात नांदूर खंदरमाळ गावांतर्गत लहूचा मळा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जाम्बूत बुद्रुक येथील मेंढपाळ कुशाबा हरिभाऊ देवकर हे मेंढ्या चारण्यासाठी नांदूर खंदरमाळ शिवारात लहुचा मळा येथे आले आहेत. बुधवारी सायंकाळी मेंढ्या वाघुरीत कोंडण्यात आल्या. रात्रीच्या वेळी ते जेवण करून वाघुरी जवळच झोपले. कुत्राही जवळच बसलेला होता. मध्यारात्री अचानक बिबट्याने कुत्र्यावर झेप घेतली असता शेजारी झोपलेले देवकर यांना बिबट्याने पंजा मारला. त्यामुळे त्यांच्या तोंडावर नखी मारल्याने जखमी झाले आहे. गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक सविता थोरात व रोहिदास भोईटे यांनी घटनास्थळी भेट दिली. देवकर यांना घारगाव येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. बिबट्याच्या मळ्यात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

Web Title: Sangamner Shepherd injured in Bibatya attack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here