Home क्राईम परदेशी तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून बोलावून वेश्याव्यवसायास पाडले भाग

परदेशी तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून बोलावून वेश्याव्यवसायास पाडले भाग

lured a foreign girl to a job and forced her into prostitution

पुणे |  पिंपरी: परदेशी तरुणीला नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने पुण्यात बोलावून घेऊन तिचा पासपोर्ट हिसकावून घेत तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. याबाबत एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ जानेवारी २०२० ते १० ऑक्टोबर २०२० या दरम्यान जुनी सांगवी येथे हा प्रकार घडला.

पिडीत तरुणीने १० जून रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून प्रोल्सी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युगांडा येथील रहिवासी आणि सध्या भारतात वास्तव्यास असलेली आरोपी महिला प्रोल्सी हिने फिर्यादी पिडीत तरुणीला फोन करून कॉल सेंटरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात बोलाविले.

पिडीत तरुणी २५ जानेवारी २०२० रोजी मुंबई विमानतळावर आली. त्याठिकाणी एका व्यक्तीला फिर्यादीला आणण्यासाठी प्रोल्सी हिने पाठविले. फिर्यादी त्या व्यक्तीसोबत नवी सांगवी येथे आल्या. तेथे आल्यानंतर प्रोल्सी हिने फिर्यादीचा पासपोर्ट काढून घेतला. तुला मी सांगेल त्याप्रमाणे काम करावे लागेल अन्यथा तुला तुझा पासपोर्ट मिळणार नाही अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी या प्रोल्सी सोबत काम करण्यास तयार झाल्या. आरोपी प्रोल्सी हिने तरुणीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहे.   

Web Title: lured a foreign girl to a job and forced her into prostitution

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here