Crime: अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल
श्रीरामपूर | Crime : एका टपरीमध्ये घुसून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून, मिठी मारून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. श्रीरामपूर शहरातील रामनगर वार्ड नंबर १ या भागात राहणारा आरोपी सद्दाम रशीद शहा वय ३२ व्यवसाय भंगारवाला याने हे कृत्य केले आहे. पिडीत मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपी त्याठिकाणाहून पळून गेला.
ही घटना घडल्यानंतर तत्काळ मुलीच्या नातेवाईकांनी श्रीरामपूर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी सद्दाम शाहाच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
श्रीरामपूर शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सद्दाम रशीद शहा यास अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पाटील हे करीत आहे.
Web Title: Shrirampur Crime Molestation of a minor girl