Home अहमदनगर नगर हादरले: माजी सरपंच यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्या

नगर हादरले: माजी सरपंच यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्या

Murder Former Sarpanch stabbed in the neck with a sharp weapon

पारनेर | Murder: पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाणयेथील माजी सरपंच राजाराम शेळके यांची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

नारायण गव्हाण सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश कांडेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या व त्यांची कोरोनामुळे पॅरोलवर सुटका झालेले नारायण गव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची धारदार शस्त्राने गळ्याने वार करत हत्या करण्यात आली.

शेळके हे त्यांच्या शेतात काम करत असताना त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. ते त्यावेळी एकटेच होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्या गळ्यावर धारदार शास्त्राने वार करण्यात आले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

Web Title: Murder Former Sarpanch stabbed in the neck with a sharp weapon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here