Home क्राईम पाकिस्तान झिंदाबादचे नारे, दोघांना अटक

पाकिस्तान झिंदाबादचे नारे, दोघांना अटक

Pune Crime: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान झिंदाबादचे नारे लावल्याची घटना, दोघांना अटक (Arrested).

Pakistan Zindabad slogans in Pune, two arrested

पुणेः १३ ऑगस्ट रोजी पुण्यात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची धक्कादायक घडली घडली होती. आता पुन्हा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान झिंदाबादचे नारे लावल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील कोंढवा भागात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दोघांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले. दोन्ही आरोपी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दोघांना अटक केली आहे.

दरम्यान, पुण्यात एका म्युझिकल कॉन्सर्टमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान करणारी घटना समोर आली होती. याप्रकरणी संबंधित गायिकेवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pakistan Zindabad slogans in Pune, two arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here