Home अकोले स्वातंत्र्य दिन चिरायू हो! सर्वोदय विद्यालयात ध्वजारोहण; सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्साह

स्वातंत्र्य दिन चिरायू हो! सर्वोदय विद्यालयात ध्वजारोहण; सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्साह

Independence Day 2023: भारताच्या 77 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त सत्यानिकेतन संस्थेचे संचालक यांच्या हस्ते सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण.

Sarvodaya Vidya Mandir Rajur Independence Day 2023

राजूर: भारताच्या 77 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2023) सत्यानिकेतन संस्थेचे संचालक विजय पवार यांच्या हस्ते सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारत माता कि जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा घोषणा देत, संजय देशमुख यांचे एन.सी.सी. पथक व राजेविनोद साबळे यांचे स्काऊड गाईडचे नियोजनबद्ध संचलन, प्रभातफेरी यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्या दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह यावेळी पाहायला मिळाला.

यावेळी विजय पवार, संदिप पवार, टि.के. महाले, विनय सावंत,रमाकांत डेरे, एम.के. बारेकर, मच्छिंद्र जगदाळे,विलास पाबळकर प्राचार्य भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य आण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी, माजी प्राचार्य मनोहर लेंडे, माजी प्राचार्य लहानु पर्बत यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Sarvodaya Vidya Mandir Rajur Independence Day 2023

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here