Home महाराष्ट्र शेतात फवारणी करताना पदर ट्रॅक्टरमध्ये अडकला, पतीच्या डोळ्यांसमोर पत्नीचा तडफडून मृत्यू

शेतात फवारणी करताना पदर ट्रॅक्टरमध्ये अडकला, पतीच्या डोळ्यांसमोर पत्नीचा तडफडून मृत्यू

Solapur: डाळिंबाच्या झाडाला फवारणी करताना ट्रॅक्टर ब्लोअरच्या रॉडमध्ये साडीचा पदर अडकून गळफास बसल्याने पतीदेखत पत्नीचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली.

Padar got stuck in the tractor while spraying the field, wife was crushed to death

सोलापूर : डाळिंबाच्या झाडाला फवारणी करताना ट्रॅक्टर ब्लोअरच्या रॉडमध्ये साडीचा पदर अडकून गळफास बसल्याने पतीदेखत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे हा हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रियांका प्रवीण येलपले (वय २९ वर्ष, रा. अजनाळे, ता. सांगोला) असे मयत महिलेचे नाव आहे. रविवार, १३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे ही घटना घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पती प्रवीण येलपले व पत्नी प्रियांका हे दोघे मिळून रविवारी शेतातील डाळिंब बागेत आले. ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या साहाय्याने डाळिंबाच्या झाडाला स्लरी सोडत होते. प्रवीण येलपले पुढे बघून ट्रॅक्टर चालवीत होते. पत्नी प्रियंका ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या साहाय्याने झाडांना स्लरी ओतत होत्या.

इतक्यात ब्लोअर ढवळणी रॉडला प्रियांकाच्या साडीचा पदर गुंडाळून तिला गळफास लागला आणि ट्रॅक्टर जाम चालू लागला. इतक्यात प्रवीण याने पाठीमागे वळून पाहिले असता प्रियांकाच्या गळ्याला साडीचा गळफास बसल्याचे दिसून आले.

प्रवीण येलपले हे पुढे पाहत ट्रॅक्टर चालवत होते. डाळिंबाच्या रोपांना औषध सोडताना अचानकपणे ट्रॅक्टर जाम झाले. पत्नीचा साडीचा पदर अडकून पत्नी प्रियांका तडफडत होती. गळफास घट्ट बसल्याने प्रियांकाला ओरडता देखील आले नव्हते.

प्रवीण यांनी ताबडतोब ट्रॅक्टर थांबवून प्रियंकाच्या गळ्याला बसलेला साडीचा गळफास काढला व उपचाराकरिता तिला तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

Web Title: Padar got stuck in the tractor while spraying the field, the wife was crushed to death

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here