35 गावांना पंकजाताई मुंडे यांनी जलमय करत पाणी प्रश्न मार्गी
35 गावांना पंकजाताई मुंडे यांनी जलमय करत पाणी प्रश्न मार्गी
खरवंडी कासार प्रतिनिधी सतिष जगताप-: श्रीक्षेत्र भगवानगड व परिसरातील 3५ गावांना श्रीक्षेत्र भगवान गडाच्या मानस कन्या ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी जलमय करत असुन पाणी प्रश्न मार्गी लावत माता भगीनिंच्या डोक्यावरिल हंडा खाली आणण्याचे कार्य केले आहे असे मत भाजपा युवा नेते नितीन किर्तने यांनी खरवंडी कासार येथे पत्रकार परिषेदेत व्यक्त केले यावेळी पत्रकारांशी बोलताना नितीन किर्तणे म्हणाले की स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचे अधुरे स्वप्न ताई पुर्णत्वास नेत आहेत सत्ता असो किंवा नसो असा संघर्षाचा वसा पंकजाताई अविरत पणे चालवत आहेत ग्रामिण जणतेचे जिवण मान उंचावले पाहीजे हेच ध्येय घेऊन सर्वसामान्यासाठी रगडत आहेत असे किर्तणे पत्रकार परिषदेत म्हणाले.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
3५ गावाची जायकवाडी धरणातुन पाणी पुरवठा योजना मंजुर केल्या बद्दल पंकजाताईचे आभार पर सत्कार मुंबई येथे रॉयल स्टॉन निवास स्थानी करण्यात आला यावेळी पाथर्डी,शेवगावच्या कार्यसम्राट आ. मोनिकाताई राजळे, यांच्यासह भाजपा उपाअध्यक्ष संजय किर्तने, खरवंडी कासार सेवा सोसायटी संचालक वामनराव किर्तने, पिराजी किर्तने, नितिन किर्तने,उद्योजक राजेंद्र ढाकणे, खरवंडी कासारचे सरपंच बुधाजी ढाकणे, भारजवाडीचे सरपंच माणिक बटुळे , मुंगूसवाडेचे उपसरपंच आबासाहेब खेडकर,मिडसांगवीचे सरपंच दत्तात्रय पठाडे,भाजपा पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच यांचे शिष्टमंडळ काल मुंबई येथे दाखल होत ताई साहेबांचे आभार मानन्यात आले. सत्कारपर बोलताना ताई साहेबांनी सांगितले भगवान गडाची लेक या नात्यांने गडासह परिसराचे स्व.गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांचे विकासाचे स्वप्न पुर्ण करणार असुन, करोडो रुपयांचा विकास कामांना निधी दिला असुन, मुख्यमंत्री सडक मधुन भगवानगड रस्त्याचे काम पुर्ण केले आहे.विकासासाठी मी कट्टीबद्ध असल्याचे यावेळी ना.पंकजाताई मुंढे यांनी यावेळी संवाद साधताना सांगितले, सर्व शिष्टमंडळाच्या वतीने ताई साहेबांचे आभार मानण्यात आले.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.