Home अहमदनगर चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या पोटाला दगड बांधूण तलावात सोडून हत्या

चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या पोटाला दगड बांधूण तलावात सोडून हत्या

Parner Husband kills wife by throwing stones at her

पारनेर | Parner: पारनेर तालुक्यात पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना तालुक्यातील वाघवाडी परिसरात घडली.

महिलेच्या पोटाला दगड बांधून तिला तलावात टाकून देण्यात आल्याने तिचा मृत्यू झाला. नंदा पोपट जाधव असे या मयत महिलेचे नाव आहे पोपट जाधव यास पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ४ वर्षापूर्वी मयत नंदा जाधव हिचा पोपट जाधव याच्याशी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर अपत्य होत नसल्याने पोपट जाध याने पत्नी नंदा हिला नेहमी त्रास देत होता. गेल्या पाच महिन्यापासून नंदा जाधव गरोदर होती.

ती गरोदर असल्याचे समजल्यावर आरोपी पोपट जाधव याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत असत. याच कारणातून ३० मार्च रोजी नंदा हिच्या पोटाला दगड बांधून तलावात टाकून दिले. त्यांनतर रविवारी ही घटना उघडकीस आली आहे.

या घटनेनंतर आरोपी पोपट जाधव हा फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेत त्याला अटक केली आहे. त्याने हत्याची कबुली दिली आहे. ह्या घटनेने पारनेर तालुक्यातील वाघवाडी येथे संताप व्यक्त होत आहे.  

Web Title: Parner Husband kills wife by throwing stones at her

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here