Home अहमदनगर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील १७ आरोपींना कोरोनाची लागण

पोलीस ठाण्याच्या कोठडीतील १७ आरोपींना कोरोनाची लागण

Parner 17 accused in police station cell infected with corona

पारनेर | Parner: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढतच आहे. या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. यामध्ये एक धक्कादायक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.

पारनेर पोलीस ठाण्याच्या कोठडीत असणाऱ्या १७ आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पारनेर पोलीस कोठडीत असलेल्या १५ आरोपींना कोरोना संसर्ग झाल्याचे सोमवारी समोर आले होते. यात आणखी दोन आरोपींचा समावेश झाला आहे. त्यामुळे ठाण्यातील एकूण करोना बाधितांची संख्या १७ झाली आहे.

पोटात तीव्र वेदना होत असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. या दरम्यान या आरोपींची कोविड चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच या आरोपींच्या पोटात पाणी झाल्याचे निष्पन्न झाले असल्याने त्यांना पुणे येथे ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पारनेर पोलीस ठाण्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या १६ आरोपींची चाचणी करण्यात आली यामध्ये १५ आरोपींचे अहवाल सकारात्मक आले आहे. या घटनेने पोलीस कर्मचारी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: Parner 17 accused in police station cell infected with corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here