Home अहमदनगर अहमदनगर कोरोना विस्फोट: दोन हजार अधिक रुग्णांची वाढ

अहमदनगर कोरोना विस्फोट: दोन हजार अधिक रुग्णांची वाढ

Ahmednagar corona blast an increase of more than two thousand patients

अहमदनगर | Ahmednagar Corona: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. आज गेल्या २४ तासांत २ हजार २० रुग्णांची वाढ झाली आहे.

नगर शहरात तब्बल ६२२ जणांना करोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्याच बरोबर संगमनेर, अकोले, कोपरगाव, पाथर्डी नगर तालुका, राहता, श्रीरामपूर तालुक्यात लक्षणीय सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयात ७६३. खासगी प्रयोगशाळेतून ८६० व अँटीजेन चाचणीत ३९७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

अहमदनगर शहर ६२२, श्रीगोंदे १०, जामखेड १८, शेवगाव ६५, भिंगार शहर ४५, राहुरी ९०, पारनेर ४७, कर्जत ५, कोपरगाव १०६, अकोले १६१, पाथर्डी ११७, नगर तालुका ११६, नेवासे ५२, श्रीरामपूर १०५, संगमनेर २०५, राहता २१४, इतर जिल्हा ३९, इतर राज्य २, मिलिटरी हॉस्पिटल १ अशा जणांना करोनाची बाधा झाली आहे.

Web Title: Ahmednagar corona blast an increase of more than two thousand patients

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here