Home संगमनेर अजिंक्य रहाणेची आजीला भेटण्याची इच्छा अधुरी, संगमनेरच्या आजींचे निधन

अजिंक्य रहाणेची आजीला भेटण्याची इच्छा अधुरी, संगमनेरच्या आजींचे निधन

Ajinkya Rahane wish to meet her grandmother

संगमनेर: लोकमत च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमाला अजिंक्य राहणे आला होता. त्यावेळी त्याने आजीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

करोनाची परिस्थिती सुधारणा झाली की मी संगमनेरला जाणार आहे माझी आजी तेथे असते. खूप दिवस झाले तिलाही भेटलो नाही. त्यामुळे वेळ मिळाला की, मी नक्की संगमनेरला येईन असे तो म्हणाला होता. संगमनेरला तुझं स्वागत करायचे आहे तर कधी वेळ देशील? या प्रश्नावर त्याने उत्तर दिले होते.  

अजिंक्य राहणे यांच्या आजी झेलूबाई बाबुराव राहणे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांचे १०० व्या  वर्षी निधन झाले. अजिंक्य राहणेचे आजीवर विशेष असे प्रेम होते. अजिंक्य राहणे तिला भेटण्यासाठी चंदनापुरीत येत होता. तिच्या निधनाने चंदनापुरीत हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Ajinkya Rahane wish to meet her grandmother

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here