अज्ञात कारणावरून पत्रकाराचे राहुरीतून अपहरण
राहुरी: राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांचे ५ एप्रिल रोजी दुपारी वाजेच्या दरम्यान मल्हारवाडी येथून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत त्याची पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्यमंत्र्यांच्या गावात पत्रकार सुरक्षित नसतील तर सामान्य लोकांचे काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत पत्रकार रोहिदास पत्नी यांनी म्हंटले आहे की, माझे पतीच्या मित्राचा मला फोन आला व त्यांनी सांगितले की, एका स्कॉर्पियो गाडीतून तुमच्या पतीचे अपहरण करून नेण्यात आले आहे.
त्यामुळे तातडीने पत्रकार रोहिदास दातीर यांच्या शोध लावावा अशी मागणी पत्रकारांतून होत आहे. राजकीय हेतूने अपहरण झाल्याचा संशय सविता दातीर यांनी व्यक्त केला आहे.
Web Title: Journalist abducted from Rahuri