Home अकोले समाजाची काही जबाबदारी आहे असं मानणारे माजी प्राचार्य व निर्भिड पत्रकार प्रकाश...

समाजाची काही जबाबदारी आहे असं मानणारे माजी प्राचार्य व निर्भिड पत्रकार प्रकाश टाकळकर

Journalist Prakash Takalkar Social Responsibility

अकोले: समाज हा अनेक घटकांचा मिळून होतो. वेगवेगळया क्षेत्रातल्या लोकांच्या एकत्रित सहभागाने या समाजाचा विकास होतो. आपल्यावर या समाजाची काही जबाबदारी आहे असं मानणारे मॉडर्न हायस्कूलचे स्कूल कमिटी सदस्य, माजी विद्यार्थी, गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्यामंदिर राजूरचे माजी प्राचार्य, सत्यानिकेतन संस्थेचे संचालक व निर्भिड पत्रकार सन्मानीय प्रकाश टाकळकर (Prakash Takalkar) यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे या हेतुने ॲक्वा सिस्टमसाठीं ७५००० रू .चेक आज मंगळवारी सुपूर्द केला.

प्रकाश पुरुषोत्तम टाकळकर यांचे माध्यमिक शिक्षण याच शाळेत झाले. त्यांची बौद्धिक चंचलता येथेच वृद्धींगत झाली. सन.१९७१ च्या दहावी बोर्ड परीक्षेत ७०० पैकी ४९२ गुण मिळवुन विद्यालयात पहिला नंबरचा बहुमान मिळविला. तद्नंतर पुढील शिक्षण पुर्ण करुन सर्वोदय विद्या मंदिर राजुर येथे शिक्षक ते प्राचार्य अशी नोकरी केली आणि त्याबरोबर निर्भिड व अभ्यासू पत्रकार म्हणुन स्वतःचा असा वेगळा ठसा निर्माण केला. या दरम्यान ज्या माॅडर्न हायस्कूल मध्ये स्वतःचे  गुणवत्तेची पायाभरणी केली, त्या शाळेची स्नेहाची नाळ कायम ठेवली. अनेक वर्षे स्कूल कमिटीचे सदस्य म्हणुन शाळेचं पालकत्व अविरतपणे सांभाळले.  सध्याचे कोरोनाचे महामारीत  विद्यार्थ्यांचा आरोग्याची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे या जाणिवेतून विद्यार्थ्यांना स्वच्छ शुध्द पाणी मिळावे हेतुने आधुनिक ॲक्वा सिस्टीम बसवण्यासाठी ७५००० रुपयाचा धनादेश शालेय प्रशासनाकडे सुपूर्द केला.

हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीषजी मोडक, मानद सचिव संजय जोशी, माजी मानद सचिव सुनिलजी रामदासी, कार्याध्यक्ष अजित बोरा, माॅडर्न हायस्कूलचे चेअरमन सतिशशेठ बुब,  ज्यु काॅलेजचे चेअरमन दिलीपभाई शहा, शालेय समिती सदस्य अनिल जोशी,  प्राचार्य संतोष कचरे,  उपप्राचार्य दिपक जोंधळे, उप मुख्याधिपिका मुंदडा मॅडम, पर्यवेक्षिका कांबळे मॅडम, कार्यालयीन अधिक्षक योगेश देशमुख यांनी विशेष आभार मानले.

Web Title: Journalist Prakash Takalkar Social Responsibility

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here