Home पारनेर ट्रॅक्टर, डंपर, छोटा टेम्पो यांच्या विचित्र अपघातात एक ठार, दोन जखमी

ट्रॅक्टर, डंपर, छोटा टेम्पो यांच्या विचित्र अपघातात एक ठार, दोन जखमी

Parner Tractor tempo Chota Hatti Accident One death

भाळवणी | Parner: पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे गोरेगाव चौकात खडी वाहतूक करणारा डंपर, उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, छोटा टेम्पो या तीन वाहनांत विचित्र अपघात घडला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री बारा ते साडे बारा वाजेच्या सुमारास घडला.

या अपघातात एक जण ठार तर दोघे जण जखमी झाले आहेत. सुदाम डेरे वय ३८ रा. पाडळी आळे ता. पारनेर असे मयताचे नाव आहे. संतोष नाथा डेरे वय ३७ व किसन लक्ष्मण डेरे वय ३३ दोघेही रा. पाडळी आळे ता. पारनेर  अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

बेल्हा पाडळी येथील सुदाम डेरे, संतोष डेरे किसान डेरे हे तीन शेतकरी भाळवनी येथील वजन काट्यावर उसाचे वजन करण्यासाठी कल्याण निर्मळ महामार्गावरून ट्रॅक्टरघेऊन येत होते. एका ट्रॅक्टरट्रोलीमध्ये उस होता. ते तिघे ट्रॅक्टरमधेच होते. शनिवारी मध्यरात्री बारा ते साडे बाराच्या सुमारास ते भाळवणी जवळ पोहोचले. त्याचवेळी खडी घेऊन चाललेला डंपर ट्रॅक्टरच्या पाठीमागून भाळवणीकडेच येत होता. तर याचवेळी छोटा टेम्पो कल्याणाच्या दिशेने जात होता. तो ट्रॅक्टरजवळ आला असता त्याचवेळी भरधाव डम्पर चालकाला समोर चाललेला उसाचा ट्रॅक्टरदिसला नाही त्यामुळे डंपरने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. समोरून येणाऱ्या छोट्या टेम्पोच्या मागील बाजूस दोन्ही वहानांची धडक बसली. धडकेनंतर ट्रॅक्टरट्रोलीसह बाजूच्या गटारात जाऊन पडला तर डंपर विरुद्ध दिशेने रस्त्याच्या बाजूला पडला यामध्ये ट्रॅक्टरचा चक्काचूर झाला होता. यात ट्रॅक्टरमधील सुदाम डेरे याचा मृत्यू झाला.  

Web Title: Parner Tractor tempo Chota Hatti Accident One death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here