Home श्रीगोंदा महिलेचा खून करून उसाच्या शेतात फेकला मृतदेह

महिलेचा खून करून उसाच्या शेतात फेकला मृतदेह

Shrigonda woman was killed and her body dumped in a sugarcane field

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावाच्या शिवारात रमेश भिकाजी पंधरकर यांच्या उसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

विशेष म्हणजे काही तरी टणक वस्तूने डोक्यात मारून खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकून देऊन पुरावा संपविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेने विसापूरसह श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत विसापूर येथील बाळू शिंदे वय ५३ बेलबंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत असे म्हंटले आहे की, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लता मधुकर शिंदे वय ५६ रा. विसापूर या महिलेला डोक्याचे पाठीमागील बाजूस टणक वस्तूने मारून खून करून उसाच्या शेतात मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्यात आला. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे. आरोपीचा बेलवंडी पोलीस शोध घेत आहेत.   

Web Title: Shrigonda woman was killed and her body dumped in a sugarcane field

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here