अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षाची सक्तमजुरी
अहमदनगर | Ahmednagar: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने २० वर्षाची सक्तमजुरी व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी या खटल्याचा निकाल दिला.
या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी काम पाहिले. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी शमिना लतीफ सय्यद वय ५२ हिला न्यायालयाने १ महिना साधी कैद व ५०० रुपये दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम पिडीत मुलीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.
नगर शहरात ही घटना घडली. अफसर लतीफ सय्यद वय २६ असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सय्यद याने १५ सप्टेंबर २०१८ रोजी सदर अल्पवयीन मुलीला मारहाण करीत तिचा विनयभंग केला होता. यावेळी मुलीची आरडाओरडा ऐकून शमिना सय्यद घटनास्थळी आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सय्यद याने पुन्हा पिडीत मुलीस उचलून त्यांच्या घराच्या छतावर नेऊन तिच्यावर अत्याचार करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर काही दिवसांनी पिडीत मुलीच्या पोटात दुखू लागल्याने ही घटना समोर आली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
Web Title: Ahmednagar Accused of torturing a minor girl gets 20 years hard labor