Home अहमदनगर Murder: शेतीच्या पाण्याच्या वादातून तरुणाला विहिरीत ढकलून खून

Murder: शेतीच्या पाण्याच्या वादातून तरुणाला विहिरीत ढकलून खून

Pathardi Murder of a young man by pushing him into a well 

पाथर्डी | Pathardi Murder Case: तालुक्यातील वडगाव येथे विहिरीतील वीज पंपातून पाणी घेण्याच्या वादातून तरुणास मारहाण करून विहिरीत ढकलून देऊन खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. भागवत मारोती गर्जे असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ संजय विठ्ठल गर्जे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी भागवत भगवान बडे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हंटले आहे की, मागील १२ दिवसांपासून वडगाव येथील वीज रोहित्र बंद होते. २८ डिसेंबर रोजी वीज रोहित्र सुरु झाल्याने भागवत गर्जे हा रात्री त्याच्या शेतात कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. तेथे त्याचा भागवत बडे याच्यासोबत पाणी देण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी बडे याने भागवत गर्जे याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने मारहाण करून त्यास विहिरीत ढकलून दिले. त्याबाबत बडे याने या घटनेबाबत कुणालातरी फोन करून सांगितल्याचे साक्षीदाराने ऐकले. त्यानंतर भागवत गर्जे याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. बडे हा फरार झाला असून याप्रकरणी सहायक निरीक्षक रामेश्वर कायंदे हे पुढील तपास करीत आहे.

Web Title: Pathardi Murder of a young man by pushing him into a well 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here