Home Accident News Accident: बसस्थानकासमोर ट्रकच्या धडकेत एक ठार

Accident: बसस्थानकासमोर ट्रकच्या धडकेत एक ठार

Nevasa Accident News One killed in truck collision

नेवासे | Nevasa Accident News: नेवासे शहरातील बसस्थानकासमोर ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत.

शिवाजी कोंडीराम डुकरे वय ६० रा. मार्केट यार्द नेवासे असे या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाहनाने धडक दिली. यामध्ये शिवाजी डुकरे हे गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. मात्र उपचारापूर्वीच ते मृत झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या अपघातात आणखी दोघे जण जखमी झाले आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल गीते हे करीत आहे.

Web Title: Nevasa Accident News One killed in truck collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here