Home अहमदनगर पालक चिंतेत: नवोदय विद्यालयात आणखी विद्यार्थ्यांना करोनाची बाधा

पालक चिंतेत: नवोदय विद्यालयात आणखी विद्यार्थ्यांना करोनाची बाधा

Corona News parner hurts more students at Navodaya Vidyalaya

पारनेर | Corona News | Parner: पारनेर तालुक्यातील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण बनले आहे.  मंगळवारी आणखी आठ नवे करोना बाधित आढळून आले आहेत.

टाकळी ढोकेश्वर येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात गेल्या चार-पाच दिवसांपासून करोना बाधित विद्यार्थी व कर्मचारी आढळत आहेत. मंगळवारी पुन्हा नव्याने आठ जणांना करोनाची बाधा झाल्याचा अहवाल मिळाला असून बाधितांचा एकूण आकडा 90 झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली. दरम्यान टाकळी विद्यालयात विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. विद्यालयाच्या बेफिकीरपणामुळेच विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्याचा आरोप मंगळवारी काही पालकानी केला आहे. त्यावर विद्यालय प्रशासनाच्यावतीने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title: Corona News parner hurts more students at Navodaya Vidyalaya

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here