Home क्राईम संगमनेर: पैसे देऊनही रुग्णवाहिका मिळाली नाही, गुन्हा दाखल

संगमनेर: पैसे देऊनही रुग्णवाहिका मिळाली नाही, गुन्हा दाखल

संगमनेर | Sangamner Crime News: रुग्णवाहिकेसाठी ठरलेल्या रकमेपैकी तब्बल ५ लाख ८० हजार रुपये देऊन देखील रुग्णवाहिका न देता फसवणूक केल्याच्या कारणावरून अश्व मोटर्सचे चालक व कासरा दुमाला येथील रहिवासी संतोष भाऊसाहेब काचोळे या आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत साकुर येथील मुळा खोरे पतसंस्थेचे व्यवस्थापक संतोष रंगनाथ पंधारे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली ,माहिती अशी की, साकुर येथील मुळा खोरे पतसंस्थेच्या वतीने समाजपयोगी काम म्हणून ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हि रुग्णवाहिका खरेदी करण्याचे अधिकार संचालक मंडळाने व्यवस्थापक संतोष पंधारे यांना दिले होते. त्यामुळे पंधारे यांनी गावातील लोकांनी मोटारी खरेदी करणाऱ्या आणि त्या घेतेवेळी सोबत असल्याने ओळखीच्या अश्व मोटर्स शोरूमच्या चालकाशी चर्चा केली. तेथील दीपक डुंगगा हे परिचयाचे असल्याने त्यांनी रुग्णवाहिका संतोष भाऊसाहेब काचोळे यांच्याकडून घेण्याचा सल्ला दिला. काचोळे यांनी आपण अश्व मोटर्सचे शोरूम चालवत असल्याचे सांगून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी अश्व मोटर्सच्या खात्यावर अनामत म्हणून एक लाख रुपये भरले.

रुग्णवाहिकेची एकूण किंमत ७ लाख २६ हजार २५५ रुपये असल्याने व रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तिच्यासाठी आणखी एक लाख रुपयांची अनामत देण्याची मागणी करण्यात आल्याने आणखी एक लाख रुपये भरले. त्यांनतर उर्वरित रक्कम रुग्णवाहिका घेतेवेळी देण्याचे ठरले. मात्र काही दिवसांनी गाड्या आल्या नसल्याचे सांगत काचोळे यांनी १ लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे पंधारे यांनी ५ डिसेंबरला तब्बल ३ लाख ८० रुपये त्यांच्या बँक खात्यावर भरले. तब्बल ५ लाख ८० हजार रुपये देऊनही काचोळे यांनी रुग्णवाहिका न दिल्याने फसवणूक (Fraud Case) झाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangamner Crime News Despite paying, the ambulance was not received

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here