Home महाराष्ट्र सुप्रिया सुळे व त्यांचे पती सदानंद सुळे यांना करोनाची लागण

सुप्रिया सुळे व त्यांचे पती सदानंद सुळे यांना करोनाची लागण

Supriya Sule and her husband Sadanand Sule Corona Positive

पुणे | Corona Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया व त्यांचे पती सदानंद सुळे यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे.

‘मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. करोनाची कोणतीही लक्षणं नसल्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही, पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली करोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन सुळे यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलं आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. प्रकृतीच्या तक्रारी असल्यास प्रत्येकानं आपली करोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर चाचण्यांचं प्रमाण वाढलं असून रुग्णांचं प्रमाणही वाढत आहे.

Web Title: Supriya Sule and her husband Sadanand Sule Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here