Home अहमदनगर विवाहितेचे इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडून तिचे फोटो व्हायरल

विवाहितेचे इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडून तिचे फोटो व्हायरल

Ahmednagar Crime News Married Woman photo viral

अहमदनगर |Ahmednagar Crime News: विवाहितेचे इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडून त्यावर तिचे फोटो व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात तरूणासह त्याला मदत करणार्‍या अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात येथील कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354 (ड), सह 43, 66 (क), 66 (ड) महिती तंत्रज्ञान अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी विवाहिता यांचे सोशल मिडीयावर फक्त व्हाट्सअप खाते आहे. ते त्याचा वापर गरजेनुसार करतात. त्यांचे इंस्टाग्रामवर खाते असल्याची माहिती त्यांच्या भावाने त्यांना दिली. यावर त्यांनी खात्री केली असता सदरच्या खात्यावर फिर्यादी यांचे फोटो दिसले. त्यामुळे त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती व त्याला मदत करणार्‍या अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar Crime News Married Woman photo viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here