अकोले तालुक्यात खून करून चेहरा जाळून टाकण्याचा प्रयत्न, मृतदेह आढळला
राजूर | Murder Case: कोल्हार घोटी रस्त्यालगत वाकी गावाच्या शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी त्या व्यक्तीचा चेहरा जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अज्ञाताने खून (Murder) करून मृतदेह नग्न अवस्थेत फेकून देण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर मृतदेह कपडे नसलेला आणि या व्यक्तीचे केस व चेहरा जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या ठिकाणी काहीं अंतरावर चार चाकी वाहनाच्या खुणा आढळून आल्या असून एक दोनशे रुपयांची नोट आढळून आली आहे. तसेच काही अंतरावर मद्याची बाटलीही आढळून आली आहे, याबाबत वाकी गावाचे पोलीस पाटील सोमनाथ सगभोर यांनी या घटनेची माहिती राजूर पोलिसांना दिली. राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला मृतदेह राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. राजूर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सदर व्यक्ती ५ फुट उंच. केसांची ठेवण लांब, रंग गोरा असे वर्णन आहे. सदर व्यक्तीबाबत कोणाला काही माहित असल्यास राजूर पोलिसांशी संपर्क करण्याचे आव्हान सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी केले आहे.
Web Title: Attempt to Murder and burn face in Akole taluka