Home Accident News दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळून अपघातात एक जण जागीच ठार

दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळून अपघातात एक जण जागीच ठार

Ahmednagar Jamkhed Accident:  दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना.

person died on the spot in an accident when a two-wheeler tractor collided with a trolley

जामखेड: जामखेड- करमाळा रोडवरील झिक्री गावा जवळ लोकसेवा मंगल कार्यालय येथे दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाले असून त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

बाबु भोसले (रा. खांडवी, ता. जामखेड) असे अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबू भोसले हे आपल्या खांडवी गावाहून जामखेडकडे येत असताना पुढे चाललेला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर लक्षात न आल्याने बाबू भोसले यांच्या मोटारसायकलची सदर ट्रॅक्टरला धडक बसून हा अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

त्यांच्यावर जामखेड शहरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत बाबू भोसले हे खांडवी येथील रहिवासी तर अरणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री अरण्येश्वर विद्यालयात शिपाई होते. त्यांच्या मृत्यूमुळे खांडवी व आरणगावावर शोककळा पसरली असून तालुक्यातील सर्व परिसरातील नागरिक विद्यार्थी मधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: person died on the spot in an accident when a two-wheeler tractor collided with a trolley

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here