Home औरंगाबाद धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थिनीला गाडीवर बसवून धाब्यावर नेऊन बलात्कार

धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थिनीला गाडीवर बसवून धाब्यावर नेऊन बलात्कार

Rape Case: औरंगाबाद हादरले! (Aurangabad) एकाच दिवशी दोन बलात्काराच्या घटना.

10th student was rape by being taken to Dhaba in a car

औरंगाबाद: औरंगाबादेतील (Aurangabad) उद्योगनगरी वाळूजमध्ये एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मैत्रीचा बहाणा करून तिच्या शाळेच्या गेटपासून मोटार सायकलवर बसवून खुलताबाद येथील धाब्यावर घेवून गेले.

त्यानंतर तिथे तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर  आली आहे. विशेष म्हणजे यापुर्वी देखील त्याने गेल्या दोन वर्षापासून तीन ते चार वेळा त्याच धाब्यावर घेवून जावून बलात्कार केला होता. या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून, आरोपी शिवा याला ताब्यात घेतले आहे.

तर दुसऱ्या घटनेत घरात शिरून पाणी पिण्याचा बहाना करत, 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला कपाशीच्या शेतात ओढत नेत तिच्यावर बलात्कार (Rape) केला. यावेळी घरात कोणीच नव्हतं.  तसेच घडलेल्या घटने प्रकरणी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. रमेश असे या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: 10th student was rape by being taken to Dhaba in a car

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here