अज्ञाताने रस्त्यावर उभे असलेले चार चाकी वाहन पेटविले – Fire
Four Wheeler Fire: अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर उभे वाहन पेटविल्याची घटना.
श्रीरामपूर: तालुक्यातील निपाणी वडगाव येथील वैदु वसाहत या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर उभे वाहन पेटविल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यात आली.
निपाणी वडगाव येथील वैदु वसाहत येथे रवी लोखंडे यांच्या मालकीचे चार चाकी वाहन रात्री उभे केले होते. नेहमीप्रमाणे सदरचे वाहन याच ठिकाणी पार्किग करण्यात येते. या ठिकाणी अनेक लहान मोठी वाहने पार्किंग करण्यात आले होते. अज्ञात व्यक्तीने लोंखडे यांच्या मालकिच्या चार चाकी वाहनाच्या जाणुनबुजुन काचा फोडून ते पेटवुन दिले. रात्रीच्या वेळी आगीचा (Fire) डोंब दिसत असल्याने स्थानिक नागरीकांनी लोंखडे यांची बहिण मनिषा लोंखडे यांना कळविले. येथील वैदु समाज समाजबांधवांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी त्यांनी बोअरवेल सुरु करुन आग आटोक्यात आणली. परंतू गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
दररोज करू शकता १ हजार ते १५ हजार रुपयांची कमाई ते ही घरबसल्या ऑनलाईन | Earn Money Online
या घटनेची माहिती परिसरातील नातेवाईक व नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांना दिली. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शरद आहिरे, किरण पवार यांनी तात्काळ भेट देत घटनेची पाहणी केली. यासंदर्भात रवि चंदर लोखंडे यांनी श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस नाईक शरद आहिरे करीत आहेत.
Web Title: person set fire to a four-wheeler parked on the road
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App