Home पुणे चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा कौटुंबिक हिंसाचार केल्याचा धक्कादायक प्रकार

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा कौटुंबिक हिंसाचार केल्याचा धक्कादायक प्रकार

Harassment of spouse on suspicion of character:  चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करून उपाशीपोटी ठेवत जबरदस्तीने गर्भपात करण्यासाठी भाग पडल्याचा धक्कादायक प्रकार.

Harassment of spouse on suspicion of character

बारामती:  सासरच्या लोकांकडून विवाहितेला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करून उपाशीपोटी ठेवत जबरदस्तीने गर्भपात करण्यासाठी भाग पडल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील मेहद येथून समोर आला आहे. याबाबत विवाहितेने पती, सासूसह दोन नणंदाविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साक्षी विशाल नेवसे, (वय २२) रा. मेडद (ता. बारामती जि. पुणे), सध्या रा.- निमगाव केतकी ता. इंदापुर जि. पुणे) यांनी पती विशाल चंद्रकांत नेवसे, सासु कमल चंद्रकांत नेवसे, दोघे (रा. मेडद ता. बारामती) नणंद जय श्री बाबा रासकर (रा. न्हावी ता. इंदापुर जि. पुणे), निना संतोश दगडे, (रा. माळवाडी लोणी, ता. बारामती) यांच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार  आहे.

४ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्न झाल्यानंतर सहा महिन्यानंतर १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वेळोवेळी सासरी असताना चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ सुरू केला होता. पती विशाल चंद्रकांत नेवसे, सासु कमल चंद्रकांत नेवसे, ननंद जयश्री बाबा रासकर व निमा संतोश दगडे, यांनी सातत्याने चारित्र्यावर संशय घेऊन हाताने मारहाण केली. तसेच शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देऊन उपाशी पोटी ठेवून मानसिक व शाररीक छळ केला होता. त्यानंतर विवाहितेच्या इच्छेविरुध्द जाऊन जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला असल्याचे नमूद फिर्यादीत म्हटले आहे. 

दररोज करू शकता १ हजार ते १५ हजार रुपयांची कमाई ते ही घरबसल्या ऑनलाईन | Earn Money Online

Web Title: Harassment of spouse on suspicion of character

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here