राज्यात ७ हजार पदांची पोलीस भरती, या तारखेपासून प्रक्रिया सुरु
मुंबई | Police Bharati Date in Maharashtra : राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती करणार असल्याची माहिती समोर आली होती. राज्यातील अनेक तरुण तरुणी पोलीस भरतीची वाट पाहत आहे. भरती जाहीर तर होतीये, पदं देखील रिक्त आहेत परंतु राज्य सरकारकडून तारखा मात्र जाहीर करण्यात येत नव्हत्या. कधीपासून भरती प्रक्रिया राबविली जाणार याबाबत कुणालाच कल्पना नव्हती आणि वाट बघून देखील उमेदवार वैतागले होते. परंतु आता या सगळ्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी पूर्णविराम लावला आहे.
जूनच्या 15 तारखेपासून पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. इतकंच काय तर यानंतर सुद्धा राज्य मंत्रिमंडळासमोर 15 हजार पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे असंही वळसे पाटील म्हणालेत. पोलीस यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
राज्यात 50,000 पोलीस पदे रिक्त आहेत. साडेपाच हजार उमेदवारांची भरती पूर्ण झालीये.सात हजार पदांची भरती काढली गेलीये, 15 हजार पदे अधिक भरण्यासाठी प्रस्ताव देण्यात आलाय आणि भरती प्रक्रिया 15 जून पासून सुरु करण्यात येणार आहे.
Web Title: Police Bharati Date in Maharashtra