Home संगमनेर संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला सात वर्षाची शिक्षा

संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला सात वर्षाची शिक्षा

Accused of abusing a minor girl sentenced to seven years

Sangamner | संगमनेर: तालुक्यातील संगमनेर खुर्द येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी दिलावर शेख वय २१ रा. संगमनेर खुर्द याने लग्नाचे आमिष दाखवून तिला एका खोलीमध्ये डांबून ठेवले होते. या मुलीवर अत्याचारप्रकरणी (abusing) दिलावर शेख याला सात वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २०१६ मध्ये संगमनेर तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपी दिलावर शेख याने त्याच्या घरामध्ये १५ दिवस या मुलीला ठेवले होते. या मुलीचा शोध तिच्या घरच्यांनी घेतला असता दिलावर शेख याच्या घरी ही मुलगी सापडली. त्यानंतर दिलावर शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही, जे, सरवदे यांच्याकडे देण्यात आला. तपास पूर्ण करून जिल्हा न्यायाधीश कोर्टात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.  

Web Title: Accused of abusing a minor girl sentenced to seven years

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here