Home Accident News अहमदनगर: क्रुझर जीपचा ट्रकला अपघात; एक ठार, आठ जखमी- Accident

अहमदनगर: क्रुझर जीपचा ट्रकला अपघात; एक ठार, आठ जखमी- Accident

Cruiser jeep truck accident One killed, eight injured

Ahmednagar | अहमदनगर: ट्रकला भरधाव वेगात पाठीमागून क्रुझर जीपने धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात एक जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत.

नगर-औरंगाबाद महामार्गावर खोसपुरी (ता. नगर) शिवारात आज पहाटे हा अपघात झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

खोसपुरी शिवारातील हॉटेल संग्राम पॅलेस समोर उभ्या असलेल्या ट्रकला (एमएच 14 एचयु 0227) क्रुझर गाडीने (एमएच 16 एटी 1406) भरधाव वेगात पाठीमागून जोराची धडक दिली. क्रुझर गाडी अहमदनगरकडून औरंगाबादकडे चालली होती.

या अपघातात शांताराम लक्ष्मण घन (वय 40 रा. घनवाडा ता. सोयगाव, जि. औरंगाबाद ) हे ठार झाले. तर श्रद्धा कैलास पवार (वय 30), विकी नाना पाटील (वय 27), नंदा शांताराम घन (वय 32), वेदांत शांताराम घन ( वय 14), खुशी शांताराम घन (वय 11), राजपाल अशोक पवार (वय 15), राजगुरू कैलास पवार ( वय 22), कैलास अर्जुन पवार (सर्व रा. जामनेर ता. जामनेर) हे जखमी झाले आहेत.

हा अपघात पहाटे चार वाजेच्या सुमारास घडला. या जखमी मधील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमींवर अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Cruiser jeep truck accident One killed, eight injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here