Home अहमदनगर Crime: पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून मारहाण, १३ जणांवर गुन्हा

Crime: पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून मारहाण, १३ जणांवर गुन्हा

Police officer beaten, Crime Filed

Ahmednagar Crime | Rahuri | राहुरी: राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे एका जमावाने निळा झेंडा उभा केला. या घटनेला पोलीस पथकाने मज्जाव केला. तेव्हा जमावाकडून एका पोलीस कर्मचार्‍याला धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी 13 जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर  माहिती अशी, काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे निळा झेंडा लावण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. वाद मिटल्यानंतर त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान दि. 12 एप्रिल रोजी एका जमावाने तांभेरे येथे निळा झेंडा उभा केला.

घटनेची माहिती समजाताच, पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल करण्यात आला. पोलीस पथकाने काही कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. त्यावेळी जमावाकडून पोलीस पथकामधील हवालदार ज्ञानदेव गर्जे यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी स्वप्नील भारत तांबे, प्रसाद सुधाकर तांबे, शुभम अंतोन तांबे, चंद्रकांत गोरख तांबे, वैभव बाजीराव चोकर, संजय सोन्याबापू कांबळे, दीपक दिनकर तांबे, मार्तंड माधव तांबे, राजू आनंदा तांबे, अशोक बाबुराव तांबे, अक्षय अशोक तांबे, अजित पोपट तांबे, दादासाहेब ऊर्फ दाविद प्रल्हाद कांबळे या 13 जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Police officer beaten, Crime Filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here